2022-23 मध्ये जीईएम अर्थात सरकारी ई बाजारपेठेने रु. 2 लाख कोटी मूल्याच्या वस्तूंच्या विक्रीचा टप्पा ओलांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"उत्तम! @GeM_India ने आपल्याला भारतातील लोकांची ऊर्जा आणि उद्यमशीलतेची झलक दाखवली आहे. यामुळे अनेक नागरिकांसाठी समृद्धी आणि चांगली बाजारपेठ सुनिश्चित झाली आहे."
Excellent! @GeM_India has given us a glimpse of the energy and enterprise of the people of India. It has ensured prosperity and better markets for many citizens. https://t.co/EhDdZofBqk
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2023