पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठ्याची 60% व्याप्ती झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे आणि यामुळे अनेकजण सक्षम होतील असे म्हटले आहे. आगामी काळात ही व्याप्ती अधिक वेगाने वाढवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले;
"ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे आणि ती अनेकांना सक्षम करेल. आगामी काळात ही व्याप्ती आणखी वेगवान करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत."
This is an outstanding achievement and will empower several lives. We are doing everything possible to increase this coverage at an even greater pace in the times to come. https://t.co/prHjrIhz02
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2023