राष्ट्रपतींनी चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू सतनाम सिंग संधू यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
एका एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“राष्ट्रपतीजींनी सतनाम सिंग संधू यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केल्याचा मला आनंद झाला आहे. प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि तळागाळातील लोकांची विविध प्रकारे सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून सतनाम जी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी नेहमीच राष्ट्रीय एकात्मतेसाठी व्यापक काम केले आहे आणि परदेशातील भारतीय समुदायासोबतही काम केले आहे. त्यांच्या संसदीय प्रवासासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की त्यांच्या विचारांनी राज्यसभेचे कामकाज समृद्ध होईल.
@satnamsandhuchd”
I am delighted that Rashtrapati Ji has nominated Shri Satnam Singh Sandhu Ji to the Rajya Sabha. Satnam Ji has distinguished himself as a noted educationist and social worker, who has been serving people at the grassroots in different ways. He has always worked extensively to… pic.twitter.com/rZuUmGJP0q
— Narendra Modi (@narendramodi) January 30, 2024