पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील कुल्लू इथल्या आग दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या कुटुंबांबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत आणि बचाव कार्य करत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"हिमाचल प्रदेशातील कुल्लू इथे झालेले अग्निकांड अत्यंत दु:खद आहे. ऐतिहासिक मलाणा गावात झालेल्या या दुर्घटनेतील सर्व पिडीत कुटुंबांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत आणि बचाव कार्य करत आहे."
हिमाचल प्रदेश के कुल्लू में हुआ अग्निकांड अत्यंत दुखद है। ऐतिहासिक मलाणा गांव में हुई इस त्रासदी के सभी पीड़ित परिवारों के प्रति मैं अपनी संवेदना व्यक्त करता हूं। राज्य सरकार और स्थानीय प्रशासन राहत और बचाव के काम में पूरी तत्परता से जुटे हैं।
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2021