बिहारच्या लखीसराय येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
याबरोबरच जखमींची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी देखील त्यांनी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधान संदेशात म्हणाले:
"बिहारच्या लखीसराय इथे झालेला रस्ते अपघात अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत आप्त गमावलेल्यां प्रती माझ्या सहवेदना. याबरोबरच सर्व जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांची शक्यतोपरी मदत करत आहे : पंतप्रधान"
बिहार के लखीसराय में हुआ सड़क हादसा अत्यंत दुखद है। इस दुर्घटना में जिन्होंने अपनों को खोया है, उनके प्रति मेरी शोक-संवेदनाएं। इसके साथ ही मैं सभी घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं। राज्य सरकार की देखरेख में स्थानीय प्रशासन पीड़ितों की हरसंभव सहायता में जुटा है: PM…
— PMO India (@PMOIndia) February 21, 2024