पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे;
“जम्मू आणि काश्मीर मधील बस अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून, पंतप्रधान @narendramodi यांनी, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबातील जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी रुपये 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.”
Expressing grief on the bus accident in Jammu and Kashmir, PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000.
— PMO India (@PMOIndia) May 31, 2023