PM Modi holds virtual bilateral summit with Denmark PM Mette Frederiksen
India is working with Japan and Australia towards supply-chain diversification and resilience: PM
Events in the past months have made it clear how important it is for like-minded countries like India, which share a rules-based, transparent, humanitarian & democratic value-system, to work together: PM

आदरणीय महोदय, नमस्कार.

या आभासी संमेलनाच्या माध्यमातून मला आपल्या सोबत संवाद साधण्याची संधी मिळते आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो आहे. सर्वप्रथम, कोवीड – 19 मुळे डेन्मार्कची जी हानी झाली आहे, त्याबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. या संकटावर मात करणाऱ्या कुशल नेतृत्वाचे मी अभिनंदन करतो.

अतिशय व्यस्त वेळापत्रक असतानासुद्धा या संवादासाठी आपण वेळ काढला, यावरून आपल्या दोन्ही देशांमधील नात्याकडे आपले लक्ष आणि या नात्याप्रति विशेष वचनबद्धता दिसून येते.

आपण नुकतेच विवाहबद्ध झाले आहात, त्याबद्दल मी आपणास मनापासून शुभेच्छा देतो. कोवीड-19 मुळे उद्‌भवलेली परिस्थिती सुधारल्यानंतर लवकरच आम्हाला भारतात आपले सहकुटुंब स्वागत करण्याची संधी मिळेल, अशी आशा आम्हाला वाटते. आपली कन्या इदा पुन्हा एकदा भारतात यायला उत्सुक असेल, असा विश्वास मला वाटतो.

काही महिन्यांपूर्वी दूरध्वनीवरून झालेला आपला संवाद उपयुक्त होता. अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि डेन्मार्क यांच्यातील सहकार्य वाढविण्याबाबत आपण चर्चा केली होती.

आज या आभासी संमेलनाच्या माध्यमातून त्या उद्दिष्टांना आपण नवी दिशा आणि गती देत आहोत, ही आनंदाची बाब आहे. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हापासून, म्हणजेच 2009 सालापासून डेन्मार्क, व्हायब्रंट गुजरात संमेलनात सातत्याने सहभागी होतो आहे, त्यामुळे डेन्मार्कबद्दल माझ्या मनात एक विशेष आपुलकीची भावना आहे. दुसरे भारत-नॉर्डिक संमेलन आयोजित करण्याच्या आपल्या प्रस्तावाबद्दल मी आपला आभारी आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर डेन्मार्कला भेट देणे आणि आपली ही भेट घेणे, माझ्यासाठी सौभाग्याची बाब असेल.

आदरणीय महोदय,

आपल्यासारखे समविचारी देश पारदर्शक, मानवतावादी आणि लोकशाहीप्रधान मूल्यांची जोपासना करतात. अशा देशांनी एकत्रित काम करणे किती गरजेचे आहे, हे मागच्या काही महिन्यातील घटनांनंतर अधोरेखित झाले आहे.

लस विकसित करण्याबाबत सुद्धा समविचारी देशांमध्ये सहयोगाची भावना कायम राहिल्यास या साथरोगावर मात करणे अधिक सोपे होईल. या साथरोगाच्या काळात भारताची औषध उत्पादन क्षमता संपूर्ण जगासाठी उपयुक्त ठरत आहे. आम्ही लस विकसित करण्याच्या बाबतीत सुद्धा यासाठी प्रयत्नशील आहोत.

महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रांमध्ये भारत अधिक सक्षम व्हावा आणि जगाच्याही कामी यावा, यासाठी आम्ही आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत प्रयत्नशील आहोत.

या अभियानांतर्गत आम्ही सर्वसमावेशक सुधारणांवर भर देत आहोत. नियामक आणि कर क्षेत्रातील सुधारणांमुळे भारतात काम करणाऱ्या कंपन्यांचा फायदा होईल. इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा सुधारणांची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. कृषी आणि श्रम क्षेत्रात सुद्धा नुकत्याच महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

आदरणीय महोदय,

जागतिक पुरवठा साखळी कोणत्याही एकाच स्रोतावर अवलंबून असणे, जोखमीचे आहे हे कोवीड-19 ने दाखवून दिले आहे.

पुरवठा साखळी वैविध्यपूर्ण आणि लवचिक करण्यासंदर्भात आम्ही जपान आणि ऑस्ट्रेलिया सोबत काम करीत आहोत. इतर समविचारी देश सुद्धा या प्रयत्नात आमच्या सोबत येऊ शकतात.

 

आपले हे आभासी संमेलन केवळ भारत आणि डेन्मार्क यांच्यातील संबंधांसाठीच उपयुक्त ठरणार नाही तर जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एक सामायिक दृष्टिकोन तयार करण्याच्या दृष्टीनेही ते सहाय्यक ठरेल, असे मला वाटते.

आदरणीय महोदय, या संमेलनासाठी वेळ काढल्याबद्दल पुन्हा एकदा आपले अनेकानेक आभार.

आता प्रारंभिक भाषणासाठी मी आपणास येथे निमंत्रित करू इच्छितो.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi