पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधे, रेल्वेच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण दूरदृश्य प्रणाली द्वारे केले. यावेळी गुजरात सायन्स सिटी मधल्या एक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गांधीनगर राजधानी- वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेठा दरम्यानच्या मेमू सेवा गाडी या दोन नव्या गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.
केवळ कॉन्क्रीटच्या इमारती उभारणे इतकेच उद्दिष्ट नसून स्वतःचे वैशिष्ट्य असणाऱ्या पायाभूत संरचना निर्माण करणे हे आज देशाचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी संबोधित करताना सांगितले. मुलांच्या नैसर्गिक विकासासाठी त्यांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांच्या शिक्षण आणि सर्जनशीलतेलही वाव मिळायला हवा असे पंतप्रधान म्हणाले. सायन्स सिटी हा असा प्रकल्प आहे जिथे मनोरंजनाच्या गोष्टींमधून मुलांमधल्या कल्पकतेलाही प्रोत्साहन मिळते.
आज देश का लक्ष्य सिर्फ Concrete के Structure खड़ा करना नहीं है, बल्कि आज देश में ऐसे Infra का निर्माण हो रहा है जिनका अपना Character हो: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 16, 2021
बच्चों के स्वाभाविक विकास के लिए मनोरंजन के साथ-साथ उनके सीखने और उनकी क्रिएटिविटी को भी स्पेस मिलना चाहिए।
— PMO India (@PMOIndia) July 16, 2021
साइंस सिटी एक ऐसा प्रोजेक्ट है जो री-क्रिएशन और री-क्रिएटिविटी को आपस में जोड़ता है।
इसमें ऐसी री-क्रिएशनल एक्टिविटीज हैं जो बच्चों में क्रिएटिविटी को बढ़ावा देती हैं: PM
सायन्स सिटीमध्ये उभारलेली ॲक्वेटिक्स गॅलरी आणखी आनंददायी ठरणार आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. केवळ देशातलेच नाही तर आशियामध्ये देखील अव्वल मत्स्यालयांपैकी हे एक आहे. जगभरातील सागरी जैवविविधता एकाच ठिकाणी पाहायला मिळणे हा एक अद्भुत अनुभव आहे असे ते म्हणाले.
साइंस सिटी में बनी Aquatics Gallery तो और भी आनंदित करने वाली है।
— PMO India (@PMOIndia) July 16, 2021
ये देश के ही नहीं बल्कि एशिया के टॉप Aquarium में से एक है।
एक ही जगह पर दुनियाभर की समुद्री जैव विविधता के दर्शन अपने आप में अद्भुत अनुभव देने वाला है: PM @narendramodi
पंतप्रधान म्हणाले, रोबोटिक्स गॅलरीत रोबोटशी संवाद साधणे हे आकर्षणाचे केंद्र आहेच , मात्र त्याचबरोबर आपल्या तरुणांना रोबोटिक्सच्या क्षेत्रात काम करण्यास प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या मनात कुतूहल निर्माण करेल.
Robotics Gallery में रोबोट्स के साथ बातचीत आकर्षण का केंद्र तो है ही, साथ ही ये Robotics के क्षेत्र में काम करने के लिए हमारे युवाओं को प्रेरित भी करेगा, बाल मन में जिज्ञासा जगाएगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 16, 2021
20 व्या शतकाच्या चालीरीती वापरून 21 व्या शतकातील भारताच्या गरजा भागवल्या जाऊ शकत नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले. म्हणूनच रेल्वेमध्ये नव्याने सुधारणा करण्याची गरज होती. ते म्हणाले की आज रेल्वे ही केवळ सेवा म्हणून नव्हे तर मालमत्ता म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांचे परिणाम दिसून येत आहेत. ते म्हणाले की, आज देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे.
द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमधील रेल्वे स्थानके देखील आता वाय-फाय सुविधांनी सुसज्ज आहेत. लोकांची सुरक्षा वाढवण्यासाठी ब्रॉडगेजवरील मानव रहित रेल्वे क्रॉसिंग्स पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत.
21वीं सदी के भारत की ज़रूरत 20वीं सदी के तौर-तरीकों से पूरी नहीं हो सकती।
— PMO India (@PMOIndia) July 16, 2021
इसलिए रेलवे में नए सिरे से Reform की जरूरत थी।
हमने रेलवे को सिर्फ एक सर्विस के तौर पर नहीं बल्कि एक असेट के तौर पर विकसित करने के लिए काम शुरु किया।
आज इसके परिणाम दिखने लगे हैं: PM @narendramodi
आज देशभर में प्रमुख रेलवे स्टेशनों का आधुनिकीकरण किया जा रहा है।
— PMO India (@PMOIndia) July 16, 2021
टीएर 2 और टीएर 3 शहरों के रेलवे स्टेशन भी अब wifi सुविधा से लैस हो रहे हैं।
सुरक्षा के दृष्टिकोण से देखें तो ब्रॉड गेज पर unmanned railway crossings को पूरी तरह से खत्म कर दिया गया है: PM @narendramodi
भारतासारख्या विशाल देशात रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की रेल्वे देखील विकासाचे नवीन आयाम , सुविधांचे नवे परिमाण आणते. गेल्या काही वर्षांच्या प्रयत्नांमुळे आज रेल्वेगाड्या प्रथमच ईशान्येकडच्या राजधानीत पोहचल्या आहेत. “आज वडनगर देखील या विस्ताराचा एक भाग झाला आहे. वडनगर स्टेशनशी माझ्या बर्याच आठवणी जोडल्या आहेत. नवीन स्थानक खरोखरच आकर्षक दिसत आहे. या नवीन ब्रॉडगेज मार्गाच्या निर्मितीमुळे वडनगर-मोधेरा -पाटण हेरिटेज सर्किट आता चांगल्या रेल्वे सेवानिशी जोडले गेले आहे, ”असे पंतप्रधान म्हणाले.
नवीन भारताच्या विकासाचे वाहन एकाच वेळी दोन मार्गावरून पुढे जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. यातील एक मार्ग आधुनिकतेचा आहे, तर दुसरा मार्ग गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणाचा आहे.
भारत जैसे विशाल देश में रेलवे की भूमिका हमेशा से बहुत बड़ी रही है।
— PMO India (@PMOIndia) July 16, 2021
रेलवे अपने साथ-साथ विकास के नए आयाम, सुविधाओं के नए आयाम लेकर भी पहुंचती है।
ये बीते कुछ वर्षों का प्रयास है कि आज नॉर्थ ईस्ट की राजधानियों तक पहली बार रेल पहुंच रही है: PM
आज वडनगर भी इस Expansion का हिस्सा बन चुका है।
— PMO India (@PMOIndia) July 16, 2021
मेरी तो वडनगर स्टेशन से कितनी ही यादें जुड़ी हैं।
नया स्टेशन वाकई बहुत आकर्षक लग रहा है।
इस नई ब्रॉडगेज लाइन के बनने से वडनगर-मोढेरा-पाटन हेरिटेज सर्किट अब बेहतर रेल सेवा से कनेक्ट हो गया है: PM @narendramodi