QuotePM Modi holds meeting with senior Ministers and officials to discuss ways to boost manufacturing and global imprint of Indian toys
QuotePM Modi calls for promoting domestic toy clusters through innovative and creative methods
QuoteToys can be an excellent medium to further the spirit of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat’, says PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय खेळण्यांची निर्मिती आणि जागतिक ओळख निर्माण करण्याच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

पंतप्रधान म्हणाले की, भारतात विविध खेळण्यांचे समूह आहेत आणि हजारो कारागीर आहेत जे देशी खेळणी तयार करतात ज्यामुळे केवळ सांस्कृतिक नाही तर लहान वयातच मुलांमध्ये जीवन-कौशल्य आणि मानसिक जडणघडण विकसित करण्यात मदत होते. ते म्हणाले की अशा क्लस्टर्सना नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील पद्धतीने प्रोत्साहन देण्यात यावे .

भारतीय खेळण्यांच्या बाजारपेठेत प्रचंड क्षमता आहे आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ‘व्होकल फॉर लोकल’ ला प्रोत्साहन देऊन या उद्योगात परिवर्तन घडवून आणता येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. तंत्रज्ञान आणि नाविन्यतेच्या वापरावर तसेच जागतिक निकषांची पूर्तता करणाऱ्या दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीकडेही आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले.

मुलांच्या मानसिक /आकलन कौशल्यांवर खेळण्यांचा परिणाम आणि राष्ट्राच्या भावी पिढीला आकार देण्यात मदत करून ते सामाजिक परिवर्तनाचे साधन कसे बनू शकतात यावर देखील या बैठकीत चर्चा झाली.

मुलाच्या मनाला आकार देण्यासाठी खेळण्यांचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व अंगणवाडी केंद्र आणि शाळांमध्ये भारतीय संस्कृती आणि नीतिमूल्यांशी निगडित खेळण्यांचा शैक्षणिक साधने म्हणून वापर केला पाहिजे. राष्ट्रीय उद्दिष्टे आणि कर्तृत्वाविषयी अभिमानाची भावना निर्माण करू शकतील अशा नाविन्यपूर्ण रचना आणि खेळणी तयार करण्यात युवकांना सहभागी करून घेण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली.

पंतप्रधानांनी नमूद केले की ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी खेळणी हे एक उत्कृष्ट माध्यम ठरू शकते. खेळण्यांमध्ये भारताची मूल्य व्यवस्था आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रस्थापित पर्यावरण-स्नेही दृष्टिकोन प्रतिबिंबित व्हायला हवा असे आवाहन त्यांनी केले. विशेषत: जे प्रदेश हातांनी घडवलेल्या खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहेत तिथे भारताच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटनाचा एक साधन म्हणून उपयोग करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली.

भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आणि मूल्ये प्रतिबिंबित करण्यासाठी ऑनलाईन गेम्ससह खेळण्यातील तंत्रज्ञान आणि रचनांमध्ये नवकल्पना रुजवण्यासाठी युवक आणि विद्यार्थ्यांसाठी हॅकेथॉन आयोजित करण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला.

वेगाने वाढणाऱ्या डिजिटल गेमिंग क्षेत्रावर भर देताना पंतप्रधान म्हणाले की, भारताने या क्षेत्रातील मोठ्या संधींचा फायदा घ्यावा आणि भारतीय संस्कृती आणि लोककथेतून प्रेरित असे खेळ विकसित करून आंतरराष्ट्रीय डिजिटल गेमिंग क्षेत्राचे नेतृत्व करावे.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India Is Positioned To Lead New World Order Under PM Modi

Media Coverage

India Is Positioned To Lead New World Order Under PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi pays tribute to Swami Ramakrishna Paramhansa on his Jayanti
February 18, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi paid tributes to Swami Ramakrishna Paramhansa on his Jayanti.

In a post on X, the Prime Minister said;

“सभी देशवासियों की ओर से स्वामी रामकृष्ण परमहंस जी को उनकी जयंती पर शत-शत नमन।”