पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज योगेश कथुनियाचे दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डिस्कस थ्रो (थाळीफेक) -F54/55/56 क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.
ते म्हणाले की, कथुनियाचा दृढनिश्चय आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"योगेश कथुनियाचे पुरुषांच्या डिस्कस थ्रो (थाळीफेक) -F54/55/56 क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. त्याच्या दृढनिश्चय आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
Many congratulations to @YogeshKathuniya for his outstanding Silver Medal win in Men's Discus Throw-F54/55/56. His commitment and outstanding performance have filled our nation with pride. pic.twitter.com/2v6FhYzKqy
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2023