बर्मिंगहम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (2022) भारताची महिला कुस्तीगीर विनेश फोगट हिने 53 किलो गटात सुवर्ण पदक जिंकल्याबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्विट सदेंशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की,
विनेश फोगट हिने आज जिंकलेले सुवर्णपदक हे अतिशय विशेष आहे. ती भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध अथलिटपैकी एक असून राष्ट्रकुल स्पर्धेत तिचे हे सलग तिसरे सुवर्णपदक आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरी आणि क्रीडा क्षेत्राप्रति लक्षणीय कटिबद्धता यांची ती मूर्तिमंत प्रतिक आहे. तिचे अभिनंदन.
Today’s Gold medal won by @Phogat_Vinesh is very special. She is one of India’s most distinguished athletes and this is her third consecutive Gold in CWG. She personifies excellence and remarkable commitment to sports. Congratulations to her. #Cheer4India pic.twitter.com/AtxLJ1m8RK
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2022