पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुंदर सिंह गुर्जर यांचे टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात कांस्य पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"सुंदर सिंह गुर्जर यांनी  जिंकलेल्या कांस्यपदकामुळे संपूर्ण देशाला  अतिशय आनंद झाला आहे. त्याने उल्लेखनीय धैर्य आणि समर्पण दाखवले आहे. त्याचे हार्दिक अभिनंदन. त्याला खूप खूप शुभेच्छा. #पॅरालिम्पिक्स"