पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी, श्री पुष्कर सिंह धामी यांचे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पुष्कर सिंह धामी यांचे मी अभिनंदन करतो.गेल्या 5 वर्षांत या देवभूमीने प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आहे. मला विश्वास आहे, की आपण आणि आपले मंत्रीमंडळातील सर्व सदस्य त्याची गती आणखी वाढवाल आणि जनतेच्या अपेक्षांनुसार विकासाचे नवे आदर्श प्रस्थापित कराल."
उत्तराखंड के मुख्यमंत्री के रूप में शपथ लेने पर @pushkardhami जी को ढेरों बधाई। बीते 5 वर्षों में देवभूमि ने हर क्षेत्र में तेजी से प्रगति की है। मुझे विश्वास है कि आप और आपके सभी मंत्री उसे और गति प्रदान करेंगे, जन आकांक्षाओं के अनुरूप विकास का एक नया प्रतिमान स्थापित करेंगे।
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2022