नायब सिंह सैनी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल नायब सिंह सैनी यांचे तसेच त्यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. ही टीम म्हणजे सुशासन आणि अनिभाव यांचे अद्भुत मिश्रण आहे जे येथील लोकांची स्वप्ने साकार करण्यासोबतच राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल. दुहेरी इंजिनाचे हे सरकार गरीब, शेतकरी, जवान , युवक आणि महिलांसोबतच समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करण्यात कोणतीही कमतरता ठेवणार नाही असा मला विश्वास वाटतो.”
हरियाणा के मुख्यमंत्री पद की शपथ लेने पर नायब सिंह सैनी जी और उनके साथ मंत्री के रूप में शपथ लेने वाले सभी साथियों को बहुत-बहुत बधाई। यह टीम सुशासन और अनुभव का एक अद्भुत संगम है, जो यहां के लोगों के सपनों को साकार करने के साथ ही राज्य के विकास को एक नई ऊंचाई पर ले जाएगी। मुझे… pic.twitter.com/YEwkVjGx5D
— Narendra Modi (@narendramodi) October 17, 2024