महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या गतिमान विकासासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस जी यांचे अभिनंदन.
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल एकनाथ शिंदे जी आणि अजित पवार जी यांचे अभिनंदन.
ही टीम अनुभव आणि धडाडी यांचा मिलाफ असून त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच महायुतीला महाराष्ट्रात ऐतिहासिक जनादेश मिळाला आहे. ही टीम राज्यातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि सुशासनासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल.
मी महाराष्ट्राच्या गतिमान विकासासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन देतो.”
Congratulations to Shri Devendra Fadnavis Ji on taking oath as Maharashtra's Chief Minister.
— Narendra Modi (@narendramodi) December 5, 2024
Congratulations to Shri Eknath Shinde Ji and Shri Ajit Pawar Ji on taking oath as the Deputy Chief Ministers of the state.
This team is a blend of experience and dynamism, and it is… pic.twitter.com/IA9rH52H1H