राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल भजनलाल शर्मा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करणाऱ्या दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांचे देखील त्यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
“राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या भजन लाल शर्मा जींसोबतच उपमुख्यमंत्री दीया कुमारी जी आणि प्रेमचंद बैरवा जी यांचे खूप खूप अभिनंदन! वीर-वीरांगनांचा हा प्रदेश तुमच्या नेतृत्वाखाली सुशासन, समृद्धी आणि विकासाचे नित्य नवे मापदंड स्थापित करेल, अशी मला खात्री आहे. या भागातील माझ्या कुटुंबियांनी ज्या विश्वासाने आणि अपेक्षांनी आपल्याला भरपूर आशीर्वाद दिला आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी भाजपा सरकार आपले सर्वस्व अर्पण करून काम करत राहील.”
राजस्थान के मुख्यमंत्री के रूप में शपथ लेने वाले भजन लाल शर्मा जी के साथ ही उप मुख्यमंत्री दीया कुमारी जी और प्रेमचंद बैरवा जी को बहुत-बहुत बधाई! मुझे विश्वास है कि वीर-वीरांगनाओं का यह प्रदेश आपके नेतृत्व में सुशासन, समृद्धि और विकास के नित-नए मानदंड स्थापित करेगा। यहां के मेरे… pic.twitter.com/szZ0Ezz5Vy
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2023