आणखी एक महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. पहिल्या सर्वात मोठ्या स्वदेशी 700 मेगावॅट इलेक्ट्रिक क्षमतेच्या गुजरातमधील काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प युनिट-3 ने पूर्ण क्षमतेने काम सुरू केले आहे.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.
पहिला सर्वात मोठा स्वदेशी 700 मेगावॅट इलेक्ट्रिक क्षमतेच्या गुजरातमधील काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प युनिट-3 ने पूर्ण क्षमतेने कार्य सुरू केले आहे. आपले शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन."
India achieves another milestone.
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2023
The first largest indigenous 700 MWe Kakrapar Nuclear Power Plant Unit-3 in Gujarat starts operations at full capacity.
Congratulations to our scientists and engineers.