हँगझाऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
@satwiksairaj आणि @Shettychirag04 या सळसळत्या जोडीने बॅडमिंटन पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांचे अभिनंदन. त्यांच्या खेळाने कोर्ट दिपून गेले. त्यांनी भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली !”
The electrifying duo of @satwiksairaj and @Shettychirag04 have won a Gold Medal in Badminton Men's Doubles. Congrats to them. Their game lights up the court and makes India proud always! pic.twitter.com/XBpdEWJp9X
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2023