वर्ष 2022-23 मध्ये गरम धातू आणि कच्चा पोलादाचे सर्वोत्कृष्ट वार्षिक उत्पादन साध्य केल्याबद्दल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे (सेल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
यावर्षी गरम धातूचे 194.09 लाख टन आणि कच्च्या पोलादाचे 182.89 लाख टन उत्पादन करून, सेलने आपल्या मागील सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या तुलनेत अनुक्रमे 3.5% आणि 5.3% वाढ नोंदवली आहे.
भारत प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे, हे यातून सूचित होत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
त्यांनी ट्विट केले:
"या शानदार यशासाठी खूप अभिनंदन! सेलचे हे उत्पादन सूचित करते की, केवळ पोलादच नाही, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये देश आत्मनिर्भरतेकडे वेगाने पाऊल टाकत आहे."
इस शानदार उपलब्धि के लिए बहुत बधाई! SAIL का यह उत्पादन बताता है कि स्टील ही नहीं, बल्कि हर क्षेत्र में देश आत्मनिर्भरता की ओर तेजी से कदम बढ़ा रहा हैं। https://t.co/sViusASjss
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2023