‘नाटू नाटू’ या गीताला सर्वोत्कृष्ट मूळ गीत यासाठीचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरआरआरच्या चमूचे अभिनंदन केले आहे.
आरआरआर चित्रपटसमूहाने सामायिक केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“एक अतिशय उल्लेखनीय कामगिरी! एम.एम. कीरावानी, प्रेमरक्षित, काल भैरव, चंद्रबोस, राहुल सिपलीगुंज या सर्वांचे अभिनंदन. मी एस एस राजामौली, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि संपूर्ण आरआरआर चित्रपट चमूचेही अभिनंदन करतो. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे.
A very special accomplishment! Compliments to @mmkeeravaani, Prem Rakshith, Kaala Bhairava, Chandrabose, @Rahulsipligunj. I also congratulate @ssrajamouli, @tarak9999, @AlwaysRamCharan and the entire team of @RRRMovie. This prestigious honour has made every Indian very proud. https://t.co/zYRLCCeGdE
— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2023