कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या पहिल्या मात्रेचे 18 वर्षांवरील वयोगटासाठीचे 100% लसीकरण पूर्ण केल्याबद्दल देवभूमीच्या नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी असेही म्हटले आहे की उत्तराखंडची ही कामगिरी देशातील कोविड 19 विरुद्धच्या लढाईत अत्यंत महत्त्वाची आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले,
"देवभूमीच्या लोकांना खूप खूप शुभेच्छा. कोविड विरुद्धच्या लढाईमध्ये उत्तराखंडची ही कामगिरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मला खात्री आहे की जागतिक महामारीविरोधात लढा देण्यामध्ये आपली लसीकरण मोहीम सर्वाधिक प्रभावी सिद्ध होणार आहे आणि यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे".
देवभूमि के लोगों को बहुत-बहुत बधाई। कोविड के खिलाफ देश की लड़ाई में उत्तराखंड की यह उपलब्धि अत्यंत महत्वपूर्ण है। मुझे विश्वास है कि वैश्विक महामारी से लड़ने में हमारा वैक्सीनेशन अभियान सबसे अधिक प्रभावी साबित होने वाला है और इसमें जन-जन की भागीदारी अहम है। https://t.co/FdfkPWr6dC
— Narendra Modi (@narendramodi) October 18, 2021