पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात वजनदार वाहक रॉकेट 'लाँच व्हेईकल मार्क 3' (LVM3) चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल भारतीय अंतराळ संस्था एनएसआयएल( NSIL), इन स्पेस(IN-SPACe) आणि इस्रो (ISRO) चे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
जागतिक कनेक्टिव्हिटीसाठी उपयोगात येणाऱ्या 36 वनवेब (OneWeb) उपग्रहांसह आपल्या सर्वात वजनदार प्रक्षेपक वाहक एलव्हीएम 3 (LVM3)चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल अभिनंदन. LVM3 भारताची आत्मनिर्भरता सिध्द करते आणि जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण सेवा बाजारात भारताची स्पर्धात्मकता आणखी वाढवते."
Congratulations @NSIL_India @INSPACeIND @ISRO on the successful launch of our heaviest launch vehicle LVM3 with 36 OneWeb satellites meant for global connectivity. LVM3 exemplifies Atmanirbharta & enhances India’s competitive edge in the global commercial launch service market.
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2022