राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत, महिलांच्या 50 किलो वजनी गटातल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत, सुवर्णपदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखत झरीनचे अभिनंदन केले आहे.
“निखत झरीन भारताचा अभिमान आहे. ती एक जागतिक दर्जाची खेळाडू असून तिच्या विशेष कौशल्यासाठी ती प्रसिद्ध आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत, सुवर्णपदक जिंकल्याबद्दल, मी तिचे अभिनंदन करतो. अनेक स्पर्धांमध्ये आपलं उत्तम प्रदर्शन कायम ठेवत तिने खेळातलं सातत्य साध्य केलं आहे.तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! #Cheer4India”
असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.
Nikhat Zareen is India’s pride. She is a world class athlete who is admired for her skills. I congratulate her on winning a Gold medal at the CWG. Excelling in various tournaments, she has shown great consistency. Best wishes for her future endeavours. #Cheer4India @nikhat_zareen pic.twitter.com/Wi6zRp26nU
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2022