सेपक टकरॉ विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये भारतीय संघाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भारताला या स्पर्धेचे पहिले वहीले सुवर्णपदक जिंकून दिल्याबद्दलही त्यांनी संघाचे कौतुक केले.

या संदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :

सेपक टकरॉ विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये भारतीय संघाने प्रदर्शित केलेल्या अद्वितीय क्रीडा कौशल्याबद्दल संघाचे अभिनंदन! या संघाने भारताला एकूण 7 पदके जिंकून दिली. पुरुष रिगू संघाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून देत  ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

ही थक्क करणारी कामगिरी जागतिक सेपक टकरॉ खेळातल्या भारताच्या आशादायी भविष्याचेच  निदर्शक आहे.