टोक्यो येथे पॅरालिम्पिक्समध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक विजेत्या कृष्णा नागरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले ;
``आपल्या बॅडमिंटन खेळाडूंना टोकियो #Paralympics मध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना पाहून आनंद झाला. कृष्णा नागरच्या उत्कृष्ट पराक्रमामुळे प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर हास्य उमलले आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याच्या पुढील प्रयत्नांसाठी त्याला शुभेच्छा. #Praise4Para``
Happy to see our Badminton players excel at the Tokyo #Paralympics. The outstanding feat of @Krishnanagar99 has brought smiles on the faces of every Indian. Congratulations to him for winning the Gold Medal. Wishing him the very best for his endeavours ahead. #Praise4Para pic.twitter.com/oVs2BPcsT1
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2021