स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 'मॉडेल' श्रेणीमध्ये जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातल्या 100% गावांनी ओडिएफ (ODF) प्लस दर्जा प्राप्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट केले:
"प्रशंसनीय प्रयत्नसाठी मी जम्मू आणि काश्मीरच्या लोकांचे अभिनंदन करतो. स्वच्छ आणि निरोगी भारताच्या दिशेने टाकलेल्या आपल्या प्रवासातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे."
Laudatory effort, for which I congratulate the people of Jammuand Kashmir. This is a monumental step in our journey towards a cleaner and healthier India. https://t.co/daxXYQ3aFY
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2023