इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अंतराळात तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे.
चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल यशस्वीपणे परतले आहे. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणून इस्त्रोने आणखी एक यशस्वी प्रयोग केला आहे.
या यशाबद्दल इस्त्रो च्या X समाज माध्यमावरील पोस्टला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“अभिनंदन @isro. 2040 पर्यंत भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याच्या आमच्या ध्येयासह, भविष्यातील आमच्या अंतराळ मोहिमांच्या प्रयत्नांमधील तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्वाचा टप्पा.”
Congratulations @isro. Another technology milestone achieved in our future space endeavours including our goal to send an Indian to Moon by 2040. https://t.co/emUnLsg2EA
— Narendra Modi (@narendramodi) December 6, 2023