पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नेमबाज श्रीहर्षा देवराड्डीचे जागतिक पॅरा शुटिंग विश्वचषक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की;
"सुवर्णपदक जिंकल्याबद्दल श्रीहर्षा देवराड्डीचा मला अभिमान वाटतो. त्यांचा निर्धार हा खर्या अर्थाने प्रेरित करणारा आहे. त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत."
Proud of Sriharsha Devaraddi for wining the Gold. His determination is truly motivating. Best wishes for his future endeavours. https://t.co/z9g42AHng3
— Narendra Modi (@narendramodi) June 8, 2022