पीएसएलव्ही- सी53 या प्रक्षेपकाद्वारे भारतीय स्टार्ट अपच्या दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन-स्पेस आणि इस्रोचे अभिनंदन केले आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
" पीएसएलव्ही सी53 मिशनने भारतीय स्टार्ट अप्सच्या दोन उपग्रहांचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करून एक नवा टप्पा सर केला आहे. ही कामगिरी साध्य केल्याबद्दल @INSPACeIND आणि @isro यांचे अभिनंदन. नजीकच्या भविष्यात अनेक भारतीय कंपन्या अंतराळ क्षेत्रात प्रवेश करतील असा विश्वास वाटत आहे."
The PSLV C53 mission has achieved a new milestone by launching two payloads of Indian Start-ups in Space. Congratulations @INSPACeIND and @isro for enabling this venture. Confident that many more indian companies will reach Space in near future.
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2022