उल्लेखनीय योगदान देत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जीईएम इंडियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे .
एका ट्विट थ्रेडमध्ये, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी माहिती दिली की जीईएम (GeM) इंडियाच्या उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना क्रेता-विक्रेता गौरव सन्मान समारंभ 2023 मध्ये गौरवण्यात आले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्रेता विक्रेता गौरव सन्मान समारोह 2023 पुरस्कार पटकावला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सरकारी ई-मार्केटप्लेसने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.
पीयूष गोयल यांच्या ट्विट थ्रेडला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी ट्विट केले;;
“@GeM_India च्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचे त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अभिनंदन. अशा प्रयत्नांमुळे भारताच्या समृद्धी आणि स्वयंपूर्णतेच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीला अधिक बळ मिळते.”
Congratulations to @GeM_India's top performers for their remarkable contributions. Such efforts strengthen India's journey towards prosperity and self-reliance. https://t.co/jn4QlJOzzW
— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2023