हांगचौ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये नौकानयन स्पर्धेत पुरुषांच्या आरएस: एक्स प्रकारात कांस्यपदक पटकावल्याबद्दल इबाद अली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. नौकानयनातील त्याच्या कामगिरीचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“नौकानयनात इबाद अलीची शानदार कामगिरी. आशियाई क्रीडा स्पर्धेत आरएस :एक्स पुरुष स्पर्धेत कांस्यपदक पटकावून त्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
आपल्या युवा प्रतिभेसाठी काहीही अशक्य नाही हे त्याच्या कामगिरीवरून सिद्ध होते.त्याला माझ्या शुभेच्छा.”
A splendid performance by Eabad Ali in Sailing. He makes us proud by winning a Bronze medal in RS:X Men’s event at the Asian Games.
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2023
His accomplishments show that nothing is impossible for our young talents. My best wishes to him. pic.twitter.com/tmVfYoLYkz