बर्लिन येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल भारतीय महिलांच्या कंपाउंड टीमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“आमच्या कंपाऊंड महिला संघाने बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले असून हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्या विजेत्यांचे अभिनंदन ! त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण यामुळे हे अभूतपूर्व यश मिळाले आहे .”
A proud moment for India as our exceptional compound Women's Team brings home India's first-ever gold medal in the World Archery Championship held in Berlin. Congratulations to our champions! Their hard work and dedication have led to this outstanding outcome. pic.twitter.com/oT8teX1bod
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2023