टोक्यो येथील पॅरालिम्पिक्समध्ये टेबल टेनिस स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविना पटेलचे अभिनंदन केले आहे.
ट्विटद्वारे पंतप्रधान म्हणाले की :
``उल्लेखनीय कामगिरी करीत भाविना पटेल यांनी इतिहास रचला आहे ! त्यांनी ऐतिहासिक रौप्य पदक मायदेशी आणले आहे. त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन. त्यांच्या आयुष्याचा प्रवास प्रेरणादायी आहे आणि तो अधिकाधिक तरूणांना क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित करेल. #Paralympics``
The remarkable Bhavina Patel has scripted history! She brings home a historic Silver medal. Congratulations to her for it. Her life journey is motivating and will also draw more youngsters towards sports. #Paralympics
— Narendra Modi (@narendramodi) August 29, 2021