पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये महिलांच्या आर2 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारी भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
अवनी लेखरा ही पॅरालिम्पिक्समध्ये तीन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरली असून तिने इतिहास घडवला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान आपल्या X वरील संदेशात म्हणाले,
“भारताने #Paralympics2024 मध्ये पदकांचे खाते उघडले!
अभिनंदन @AvaniLekhara आर2 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल. पॅरालिम्पिक्समध्ये तीन पदके जिंकून पहिली भारतीय महिला क्रीडापटू बनण्याचा इतिहास तिने घडवला आहे! तिच्या समर्पित वृत्तीचा भारताला अभिमान वाटतो आहे. #Cheer4Bharat”
India opens its medal account in the #Paralympics2024!
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2024
Congratulations to @AvaniLekhara for winning the coveted Gold in the R2 Women 10M Air Rifle SH1 event. She also creates history as she is the 1st Indian woman athlete to win 3 Paralympic medals! Her dedication continues to…