कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. कर्नाटक मध्ये पायाभूत सेवा सुविधांचा विकास घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे एस एम कृष्णा एक उल्लेखनीय नेते होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे :

एस एम कृष्णा हे एक असै उल्लेखनीय नेते होते, ज्यांचे कौतुक सर्व स्तरातील लोक  करतात. त्यांनी नेहमीच इतरांचे जीवनमान सुधारण्यासाठी  अथक परिश्रम घेतले. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळासाठी, विशेषत: पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल ते सर्वांच्या स्मरणात आहेत. एस.एम. कृष्णा हे विपुल वाचन करणारे विचारवंत होते.

गेल्या अनेक वर्षांमध्ये मला  एस एम कृष्णा यांच्याशी संवाद साधण्याच्या अनेक संधी मिळाल्या, त्या स्मृती मी सदैव स्मरणात ठेवेन. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.”

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Why agriculture is key to building Viksit Bharat

Media Coverage

Why agriculture is key to building Viksit Bharat
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 05 ऑगस्ट 2025
August 05, 2025

Appreciation by Citizens for PM Modi’s Visionary Initiatives Reshaping Modern India