गुजरातमधील मोरबी येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. गुजरातमधील मोरबी येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मोदी यांनी मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट संदेशात म्हटले आहे;
"मोरबीमध्ये भिंत कोसळल्याने झालेली शोकांतिका ह्रदय विदीर्ण करणारी आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या सहवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. स्थानिक अधिकारी पीडितांना शक्य ती सर्व मदत करत आहेत."
"मोरबी येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान"
Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who have lost their lives due to the tragedy in Morbi. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi https://t.co/AlbwctnOUy
— PMO India (@PMOIndia) May 18, 2022