ज्येष्ठ नेते श्यामदेव राय चौधरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला.चौधरी यांचे संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी समर्पित होते,त्यांचे काशीच्या विकासात उल्लेखनीय योगदान होते असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्स या समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हणतातः
अखेरपर्यंत जनसेवेसाठी वाहून घेतलेले भाजपचे वरिष्ठ नेते श्यामदेव राय चौधरी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. आम्ही सर्व जण त्यांना प्रेमाने 'दादा' म्हणत असू. त्यांनी संघटनेला आकार देण्यात आणि वाढवण्यात त्याचबरोबर काशीच्या विकासासाठीही पूर्ण समर्पित भावनेने योगदान दिले. त्यांच्या जाण्याने काशी बरोबरच संपूर्ण राजकीय विश्वाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. या दुःखद प्रसंगात त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या पाठीराख्यांना परमेश्र्वर बळ देवो. ओम शांति!"
जनसेवा में जीवनपर्यंत समर्पित रहे भाजपा के वरिष्ठ नेता श्यामदेव राय चौधरी जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। स्नेह भाव से हम सभी उन्हें 'दादा' कहते थे। उन्होंने ना केवल संगठन को सींचने और संवारने में अहम योगदान दिया, बल्कि काशी के विकास के लिए भी वे पूरे समर्पण भाव से जुटे रहे।… pic.twitter.com/trRbl7AK0z
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2024