पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतरत्न महामना पंडित मदन मोहन मालवीय यांचे पणतू गिरीधर मालवीय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. गंगा स्वच्छता मोहिमेत आणि शिक्षण जगतात गिरीधर मालवीय यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे :
“भारतरत्न महामानव पंडित मदन मोहन मालवीय जी यांचे पणतू गिरीधर मालवीय जी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण जगतासोबतच संपूर्ण देशाची अपरिमित हानी झाली आहे. गंगा स्वच्छता अभियानातील त्यांचे योगदान चिरकाल स्मरणात राहील. न्यायिक सेवेमध्ये देखील त्यांनी आपल्या कामगिरीतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची व्यक्तिगत भेट घेण्याचे सौभाग्य मला अनेकदा लाभले होते. 2014 आणि 2019 मध्ये माझ्या वाराणसी मतदार संघाचे ते प्रस्तावक होते. ही बाब माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. अशा कठीण प्रसंगी ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य प्रदान करो! ओम शांती!”
भारत रत्न महामना पंडित मदन मोहन मालवीय जी के प्रपौत्र गिरिधर मालवीय जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उनका जाना शिक्षा जगत के साथ-साथ पूरे देश के लिए एक अपूरणीय क्षति है। गंगा सफाई अभियान में उनके योगदान को हमेशा याद किया जाएगा। न्यायिक सेवा में अपने कार्यों से भी उन्होंने अपनी एक…
— Narendra Modi (@narendramodi) November 18, 2024