पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाराबांकी येथील पूर्वांचल महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातातल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्ती त्वरित बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना केली आहे आणि त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन सर्व प्रकारची मदत करत आहे.
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे,
"बाराबांकी येथील पूर्वांचल महामार्गावर झालेला अपघात खूपच दुःखदायक आहे, या अपघातात ज्या लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्या प्रती मी सहसवेदना व्यक्त करत आहे. त्याचबरोबर सर्व जखमी झालेल्यांप्रती ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी कामना करत आहे.राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन सर्व प्रकारची मदत करत आहे.
बाराबंकी में पूर्वांचल एक्सप्रेसवे पर हुआ हादसा अत्यंत दुखद है। इसमें जिन लोगों ने अपनों को खोया है, उनके प्रति मैं अपनी शोक-संवेदना व्यक्त करता हूं। इसके साथ ही सभी घायलों की शीघ्र कुशलता की कामना करता हूं। राज्य सरकार की देखरेख में स्थानीय प्रशासन हरसंभव मदद में जुटा है: PM
— PMO India (@PMOIndia) July 25, 2022