पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील कारखाना दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;
"हिमाचल प्रदेशातील ऊना येथे एका कारखान्यात घडलेली दुर्घटना दु:खद आहे. यात जीव गमवावा लागलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. यासोबतच दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो: पंतप्रधान"
"पीएमएनआरएफ द्वारे हिमाचल प्रदेशातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान"