तमिळनाडूत तिरुपथूर इथे झालेल्या रस्ते दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने x वर पोस्ट केले आहे;
“तमिळनाडूत तिरुपथूर येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त करतो. . शोकग्रस्त कुटुंबियांप्रती माझी संवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. अपघातातील मृताच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मधून दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत दिली जाईल. पंतप्रधान @narendramodi”
Saddened by the loss of lives due to a road mishap in Tirupathur, Tamil Nadu. Condolences to the bereaved families. I pray that the injured recover soon. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000:…
— PMO India (@PMOIndia) September 11, 2023