पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशा सदिच्छाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.
अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या जवळच्या नातेवाइकांना ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रूपये तर, जखमींवर तातडीने उपचारासाठी 50,000 रूपये मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट केले;
‘’उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेला रस्ते अपघात अत्यंत वेदनादायक आहे. या अपघातामध्ये ज्यांनी आपल्या नातेवाइकांना गमावले, त्यांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांना अशा कठिण प्रसंगातून सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी. त्याचबरोबर या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करीत आहे : PM @narendramodi”
पंतप्रधानांनी या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या जवळच्या नातेवाइकांना ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’ तून दोन लाख रूपये तर, जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी 50,000 रूपये मदत जाहीर केली आहे.
उत्तर प्रदेश के हाथरस में हुई सड़क दुर्घटना अत्यंत पीड़ादायक है। इसमें जिन्होंने अपने परिजनों को खोया है, उनके प्रति मेरी गहरी संवेदनाएं। ईश्वर उन्हें इस कठिन समय में संबल प्रदान करे। इसके साथ ही मैं हादसे में घायल लोगों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं। राज्य सरकार की…
— PMO India (@PMOIndia) September 6, 2024
The Prime Minister has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased in the mishap in Hathras, UP. The injured would be given Rs. 50,000. https://t.co/7qucGLR6ug
— PMO India (@PMOIndia) September 6, 2024