पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. अपघातातल्या बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळाला भेट देण्यासाठी निघाले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीकडून 2 लाख रुपयांचे आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले आहे.
पंतप्रधानांनी समाजमाध्यम एक्स वर पोस्ट केले;
“पश्चिम बंगालमधील झालेला रेल्वे अपघात फारच दुःखद आहे. आपले प्रियजन गमावलेल्या लोकांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. अधिकाऱ्यांशी बोलून तेथील परिस्थिती जाणून घेतली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू आहे आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी निघाले आहेत.”
पंतप्रधान कार्यालयाने समाजमाध्यम एक्सवर पोस्ट केले;
“पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातातील प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.तसेच अपघातातील जखमींना 50,000 रुपये दिले जातील.”
The railway accident in West Bengal is saddening. Condolences to those who lost their loved ones. I pray that the injured recover at the earliest. Spoke to officials and took stock of the situation. Rescue operations are underway to assist the affected. The Railways Minister Shri…
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2024
PM @narendramodi has announced that an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased in the railway mishap in West Bengal. The injured would be given Rs. 50,000. https://t.co/2zsG6XJsGx
— PMO India (@PMOIndia) June 17, 2024