पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपयांची आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“मध्य प्रदेशातील हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांप्रति सहवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य लाभ होवो ही सदिच्छा. स्थानिक प्रशासन सर्व बाधितांना मदत करत आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत स्वरूपात दिले जातील.”
Distressed by the loss of lives due to the mishap at a cracker factory in Harda, Madhya Pradesh. Condolences to all those who have lost their loved ones. May those injured recover at the earliest. The local administration is assisting all those affected.
— PMO India (@PMOIndia) February 6, 2024
Rs. 2 lakh from PMNRF…