पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरिया मध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आम्ही सीरियाच्या नागरिकांच्या दुःखात सहभागी आहोत आणि या कठीण परिस्थितीत सर्वतोपरी साहाय्य आणि पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे:
"या विनाशकारी भूकंपामुळे सीरियावरही परिणाम झाला आहे हे जाणून खूप वेदना झाल्या. बळींच्या कुटुंबीयांप्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो. सीरियाच्या नागरिकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत आणि या कठीण काळात मदत आणि पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत."
Deeply pained to learn that the devastating earthquake has also affected Syria. My sincere condolences to the families of the victims. We share the grief of Syrian people and remain committed to provide assistance and support in this difficult time.
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2023