ईशान्य एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करत आहे , असे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:
“ईशान्य एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्यामुळे झालेल्या अपघातातील जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रति संवेदना . जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो. प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करत आहे : पंतप्रधान”
Pained by the loss of lives due to the derailment of a few coaches of the North East Express. Condolences to the bereaved families. I pray for a quick recovery of the injured. Authorities are providing all possible assistance to all those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 12, 2023