पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बाडमेर -जोधपूर महामार्गावर बस-टँकरच्या धडकेमुळे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) सानुग्रह मदत देखील मंजूर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विटर संदेशात म्हटले आहे;
"राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर बस-टँकरच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात लोकांना आपला जीव गमवावा लागला, हे दुःखद आहे. या दुःखाच्या प्रसंगी, मी त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो.
जखमी व्यक्तींना लवकर बरे वाटावे अशी मी प्रार्थना करतो : पंतप्रधान @narendramodi
राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील : पंतप्रधान @narendramodi"
An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to the accident at the Barmer-Jodhpur Highway in Rajasthan. The injured would be given Rs. 50,000 each: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 10, 2021