पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोराममधील पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे..

पंतप्रधान कार्यालयाने एक्स यावर पोस्ट केले आहे;

“मिझोरममधील पूल दुर्घटनेमुळे दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती संवेदना. जखमींना लवकर बरे वाटावे. बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.

प्रत्येक मृताच्या जवळच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपये दिले जातील आणि जखमींना 50 हजारांची मदत दिली जाईल. : पंतप्रधान @narendramodi"