मुंबईतील गोरेगाव येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख आणि जखमींना 50,000 रुपये अनुदान जाहीर.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;
“मुंबईच्या गोरेगाव येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. शोकग्रस्त कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. जखमींना लवकर बरे वाटावे अशी मी प्रार्थना करतो. बाधितांना शक्य तेवढी सर्व मदत अधिकारी करत आहेत.पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून
प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.
Pained by the loss of lives due to a fire mishap in Mumbai's Goregaon. Condolences to the bereaved families. I pray that the injured recover soon. Authorities are providing all possible assistance to those affected.
— PMO India (@PMOIndia) October 6, 2023
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the…
मुंबईतल्या गोरेगाव इथल्या आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानी वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना . जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी मी प्रार्थना करतो. सर्व पीडितांना आवश्यक ती मदत प्रशासन करत आहे.
— PMO India (@PMOIndia) October 6, 2023
मृतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी दोन लाख…