तेलंगणातील सिकंदराबाद येथे लागलेल्या आगीमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ) मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये आणि या अपघातात जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे;
"तेलंगणातील सिकंदराबाद येथे लागलेल्या आगीमध्ये झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले. शोकाकुल कुटुंबियांप्रति शोक संवेदना .जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो. मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल : पंतप्रधान @narendramodi"
Saddened by the loss of lives due to a fire in Secunderabad, Telangana. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. Rs. 2 lakh from PMNRF would be paid to the next of kin of each deceased. Rs. 50,000 would be paid to the injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 13, 2022